नाशिकचे प्रा. रामनाथ रावळ यांचा पुढाकार
पुणे : करोना विषाणू संसर्गामुळे मिळालेली सक्तीची सुटी उपयोगात आणण्यासाठी नाशिकचे प्रा. रामनाथ रावळ यांनी पुढाकार घेतला आहे. फे सबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मी आणि मोडी लिपीचे प्रशिक्षण सुरू के ले आहे.
करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने राज्यातील महाविद्यालये बंद के ली आहेत. प्राध्यापकांना घरातूनच काम करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे करोना संसर्ग रोखण्यासाठी देण्यात आलेल्या सक्तीच्या सुटीमध्ये शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा प्रयत्न नाशिकच्या के टीएचएम महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक असलेले रामनाथ रावळ करत आहेत. लिपी अभ्यासक असलेल्या प्रा. रावळ यांनी फे सबुकच्या माध्यमातून ब्राह्मी आणि मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग सुरू के ले आहेत. मंगळवारपासून (२४ मार्च) त्यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर ऑनलाइन वर्ग सुरू केला आहे. आता रोज चार ते पाच या वेळेत ते ऑनलाइन प्रशिक्षण देणार आहेत.
ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाची प्रा. रावळ यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ‘करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताच कामा नये. बहुतेक लोक घरातूनच काम करत आहेत. मात्र, घरी असणे सत्कारणी लावण्याचा प्रयत्न म्हणून ब्राह्मी आणि मोडी लिपीचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. ब्राह्मी लिपी ही जवळपास दोन हजार वर्षे जुनी आहे. या लिपीतून विविध लिपींचा जन्म झाला. त्यामुळे ऑनलाइन वर्गात काही दिवस ब्राह्मी लिपीचे आणि नंतर मोडी लिपीचे प्रशिक्षण देण्यात येईल. ऑनलाइन वर्ग असल्याने लहानांपासून मोठय़ापर्यंत कोणालाही त्याचा लाभ घेता येऊ शके ल,’ असे प्रा. रावळ यांनी सांगितले.
अभ्यासक तयार व्हावेत
मोडी लिपीतील अनेक कागदपत्रे जगभरातील विविध संग्रहालयांमध्ये पडून आहेत. त्याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांची गरज आहे. या वर्गातून मोडी लिपीची गोडी लागून काही अभ्यासक तयार झाल्यास ही पडून असलेली कागदपत्रे वाचली जाण्यास, इतिहासाचे पैलू उलगडण्यास मदत होऊ शके ल, असेही प्रा. रावळ यांनी सांगितले.