महापालिके च्या पथकाकडून शाळांची तपासणी रखडली

पुणे : महापालिका प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी देऊनही शहरातील खासगी संस्थांच्या बहुतांश खासगी शाळा सोमवारी बंदच राहिल्या. महापालिके च्या पथकाकडून काही शाळांची तपासणी, मान्यता न झाल्याने तयारी असूनही बऱ्याच खासगी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे महापालिके च्या पथकाकडून तपासणी आणि मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून पुढील दोन ते तीन दिवसांत शहरातील खासगी शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मुभा दिल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून राज्यभरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील वर्ग सुरू झाले आहेत. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर के ले होते. प्रत्यक्षात पहिल्या दिवशी शहरातील फक्त २२ खासगी शाळा  सुरू झाल्या.  शासनाच्या निर्देशांनुसार शाळा सुरू करण्यासाठी २३ नोव्हेंबरलाच तयारी के ली. त्या वेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्याही झाल्या होत्या. पण तेव्हा पालिकेच्या निर्णयामुळे शाळा सुरू होऊ शकली नाही. आता शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षके तर कर्मचाऱ्यांचे गेल्या दहा दिवसांतील करोना चाचणी अहवाल बंधनकारक आहेत. त्यामुळे पुन्हा चाचणी करावी लागत आहे. मात्र चाचणी के ल्यानंतर अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी महापालिके चे पथक येऊन तपासणी करून मान्यता देणार आहे. मात्र या पथकाने अद्याप भेट दिलेली नाही. त्यामुळे आवश्यक तयारी असूनही शाळा सुरू करता आली नाही, अशी माहिती शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली.

महापालिकेच्या २३ शाळा सुरू

महापालिके च्या अखत्यारितील माध्यमिकच्या एकू ण ४४ शाळांपैकी २३ शाळा सोमवारी सुरू झाल्या. त्यामुळे आठ महिन्यांच्या खंडानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटीचा, शाळेच्या वर्गात बसण्याचा आनंद अनुभवायला मिळाला. मोठय़ा खंडानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळांचे र्निजतुकीकरण, सुरक्षित अंतर राखून विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था, विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षके तर कर्मचाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजणे आदी निकषांची पूर्तता करून शाळा सुरू करण्यात आल्या. सोमवारी सुरू झालेल्या शाळांमध्ये सहकारनगरमधील राजीव गांधी ई लर्निग स्कू लसह उपनगरांतील शाळांचाही समावेश आहे.  महापालिके चे माध्यमिक शिक्षणाधिकारी शिवाजी दौंडकर म्हणाले, की पहिल्या दिवशी महापालिके च्या ४४ शाळांपैकी २३ शाळा सुरू झाल्या. उर्वरित २१ शाळा सुरू करण्याबाबत बैठक झाली असून, त्या शाळा मंगळवारपासून सुरू करण्यात येतील.

संमतीपत्र देणारे पालक कमीच

विद्यार्थ्यांला शाळेत पाठवण्याबाबत पालकांचे लेखी संमतीपत्र बंधनकारक आहे. मात्र करोना संसर्गाच्या भीतीमुळे संमतीपत्र दिलेल्या पालकांची संख्या कमी आहे. त्यामुळे खासगी शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी नसेल. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन के ले जाईल. त्याशिवाय न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अध्यापन सुरूच ठेवले जाणार असल्याचे खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

शहरात माध्यमिक-उच्च माध्यमिकच्या एकू ण ५२९ शाळा आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्याध्यापकांची ऑनलाइन बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. शाळा व्यवस्थापनाकडून शाळा सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव पाठवण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सर्व शाळांनी प्रस्ताव सादर के ले. त्यानंतर महापालिके च्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या १५ शाळा भेट पथकाकडून शाळांची पाहणी करून मान्यता देणे अशी प्रक्रिया होती. त्यानुसार प्रस्तावात  कर्मचाऱ्यांचा करोना चाचणी अहवाल नसणे अशा त्रुटी असलेल्या शाळांना मान्यता देण्यात आली नाही. त्रुटींची पूर्तता के लेल्या शाळांना मान्यता देण्यात आली. अन्य शाळांनाही त्या प्रकारे मान्यता देण्यात येईल.

– सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त

पिंपरीत पहिल्या दिवशी संभ्रमावस्था, अल्प प्रतिसाद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय व खासगी शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून (४ जानेवारी) सुरू झाले. मात्र, पहिल्या दिवशी संभ्रमाचे वातावरण होते. पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. अनेक खासगी शाळांनी अडचणींचा पाढा वाचला. पिंपरी-चिंचवड शहरातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सोमवारपासून सुरू झाले. पालिकेच्या माध्यमिक विभागातील १८ विद्यालयांची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती. मात्र, त्यात बऱ्याच उणिवा असल्याचे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांचीही उपस्थितीही कमी होती. खासगी शाळांमध्ये काही ठिकाणी करोना चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले नव्हते. तर, काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पालकांची संमतिपत्रे प्राप्त झाली नव्हती. तरीही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असल्याचे चित्र शाळांमध्ये होते. प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची संमतिपत्र तपासली जात होती. आवश्यक चाचण्या केल्या जात होत्या. वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात येत होता. विद्यार्थ्यांनी मुखपट्टी घातली होती. शाळांकडूनही विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात असल्याचे चित्र बहुतांश शाळांमध्ये होते.