News Flash

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, १६ प्रवासी जखमी

ओझर्डे गावाच्या हद्दीत अपघात

mumbai pune express highway,accident, marathi news, marathi, Marathi news paper,
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

मुंबई-पुणे महामार्गावरील ओझर्डे गावाच्या हद्दीत शनिवारी एका खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. तर अन्य आठ जण किरकोळ जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. ठाणे येथून जेजूरीला देव दर्शनासाठी जाणाऱ्या बसमधून १९ प्रवासी प्रवास करत होते. महामार्ग पोलिसांसह राणी, देवदूत टीमने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2017 12:53 pm

Web Title: mumbai pune express highway accident
Next Stories
1 बैलगाडा शर्यतींवरील बंदी हटवण्यासाठी पुणे-नाशिक मार्गावर रास्ता रोको
2 संरक्षण उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याचे लष्कराचे धोरण
3 दिवसा बेकरीत काम; रात्री लूटमारी..
Just Now!
X