News Flash

धक्कादायक! भररस्त्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या; पुणेकर पाहत राहिले….

कंपनीत पाणी पुरवठा करण्यावरून वाद

पुण्यात भरदिवसा रस्त्यात कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणी पुरवठा करण्याच्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आली. अतुल तानाजी भोसले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये निर्घृणपणे हत्या केली जात असल्याचं दिसत आहे.

हत्या झालेला अतुल भोसले हा म्हाळुंगे परिसरातील एका कंपनीत दोन टँकरने पाणी पुरवठा करत होता. दरम्यान, कंपनीत पाणी पुरवठा करण्यावरून आरोपी अक्षय शिवले याने मयत अतुल भोसले याना फोन करून मला त्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे असे सांगितले. यावरून त्यांच्यात फोनवरच वाद झाला होता अशी माहिती पोलीस अधिकारी अरविंद पवार यांनी दिली आहे.

त्यानंतर दुपारच्या सुमारास म्हाळुंगे येथील ममता स्वीट दुकानासमोर अतुल भोसले याला गाठून त्याच्यावर इतर साथीदारांच्या मदतीने कोयत्याने वार केले. अतुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे अशी माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि इतर तीन साथीदार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 2:31 pm

Web Title: murder in pune over water supply kjp 91 sgy 87
Next Stories
1 पुण्यात तेल आणि तुपाच्या गोडाऊनला भीषण आग
2 तौत्के चक्रीवादळाचा दोन दिवस धोका
3 पिंपरी-चिंचवडमध्ये यंत्रणेचा उत्साह वाढवणारी आकडेवारी; रुग्णवाढीचा आलेख घसरतोय
Just Now!
X