News Flash

कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ सुरक्षा रक्षकाचा खून

डोक्यात दगड घालून आणि चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला.

प्रतिकात्मक छायाचित्र

कात्रज येथील जुन्या बोगद्याजवळ एका सुरक्षा रक्षकाचा डोक्यात दगड आणि चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेचे अद्याप कारण समजू शकले नाही. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील जुन्या बोगद्याजवळ आरिफ पठाण (वय ४५) या सुरक्षा रक्षकाचा आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डोक्यात दगड घालून आणि चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या खुनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 3:52 pm

Web Title: murder of security guard near katraj old tunnel in pune
Next Stories
1 …अन् २०० फूट उंचीच्या वजीर सुळक्यावर फडकला तिरंगा !
2 नवस फेडल्यानंतर काही तासांत काळाचा घाला..
3 मागणीप्रमाणे वाढणाऱ्या रेल्वे तिकीट दरांचा धसका!
Just Now!
X