महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना कविवर्य ‘नारायण सुर्वे जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे मानद सचिव कॅप्टन शिवाजीराव महाडकर यांना ‘भला माणूस’ पुरस्कार, दशरथ पवार यांना ‘भला श्रमभूषण’ पुरस्कार, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांना ‘सनद’ पुरस्कार जाहीर झाला आहे. बोरीभडक (ता. दौंड) येथील आयटीआय या संस्थेचा विशेष सन्मान होणार आहे. प्रत्येकी २१०० रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे गुरुवारी (२६ सप्टेंबर) रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात कष्टक ऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि लेखक प्रा. मििलद जोशी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष उद्धव कानडे यांनी कळविले आहे.