मोक्का अंतर्गत दीपक मानकरला अटक करण्यात आली. त्याची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली. मात्र महापालिकेच्या मुख्य सभेत हजेरी लावण्यासाठीचा पॅरोल न्यायालयाने मंजूर केल्याने दीपक मानकरने सर्वसाधारण सभेला हजेरी लावली.
मागील सहा महिन्यापासून जितेंद्र जगताप आत्महत्ये प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यमान नगरसेवक दीपक मानकर मोक्का अंतर्गत अटकेत आहे. मात्र सहा महिने महापालिकेच्या सर्व साधारण सभेला हजर न राहिल्यास त्या नगरसेवकाचे नगरसेवक पद कायद्यानुसार रद्द होते. त्यामुळेच या सभेला जाण्यासाठी संमती मिळावी असा अर्ज दीपक मानकरने केला होता. दीपक मानकर आजच्या सभेलाही उपस्थित राहिला नसता तर त्याचे नगरसेवक पद गेले असते. त्यामुळेच दीपकने न्यायालयाकडे दोन दिवसांसाठी पॅरोल अर्ज केला होता. न्यायालयाने मानकरचा पॅरोल अर्ज मंजूर केल्याने आज पुणे महापालिकेत तीन वाजताच्या सुमारास महापालिकेच्या सर्व साधारण सभेला दीपक मानकरने हजेरी लावली.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2019 रोजी प्रकाशित
अटकेत असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक दीपक मानकर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत
मोक्का असलेला दीपक मानकर पालिकेच्या सभेत आल्याचे स्पष्ट झाले आहे
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 17-01-2019 at 18:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp corporator deepak mankar attended mahapalika meeting today