राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज तलवार चालवत तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं. बारामती लोकसभा मतदार संघातल्या महिलांना स्वरक्षणाचे धडे मिळावेत या अनुषंगाने प्रशिक्षण वर्गांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण वर्गाला सुप्रिया सुळेही हजर होत्या. त्यांनीही तलवारबाजीचे धडे गिरवले.

पाहा व्हिडीओ

Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
rape at juhu chowpatty marathi news, high court
भरदिवसा जुहू चौपाटीवर बलात्कार करणे अविश्वनीय, आरोपीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

हडपसरच्या साधना शैक्षणिक संकुलात पवार चॅरिटेबल ट्रस्ट आि ऑल महाराष्ट्र थांग असोसिएशनतर्फे मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येते आहे. यामध्ये सुप्रिया सुळेंनीही स्वरक्षणाचे प्रकार आजमावून पाहिले. महिला आणि मुलींची सुरक्षितता हा अत्यंत गंभीर विषय राज्यात व्हायला लागला आहे. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं रहावं आणि स्वरक्षणाची जबाबदारी स्वतः घ्यावी या अनुषंगाने प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. जेव्हा घराच्या बाहेर मुलगी पडेल तेव्हा तिला भीती वाटता कामा नये असा यामागचा उद्देश आहे असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.