हडपसर येथील रामटेकडी परिसरात पुणे महापालिका प्रशासनाकडून नव्याने कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत भाजप सरकार आणि महापालिकेविरोधात निषेध नोंदवण्यात आला.

पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, हडपसर येथे कचरा प्रकल्प आल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी याचा कोणताही विचार केलेला नाही. बहुमताच्या जोरावर भाजप हा प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्प रद्द न केल्यास अधिक तीव्र लढा उभारू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

उरुळी देवाची, फुरसुंगी येथील ग्रामस्थांकडून कचरा टाकण्यास वारंवार विरोध झाल्यानंतर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या निर्माण झाली होती. शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी विविध भागांत कचरा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्याचा विचार करण्यात आला. यात हडपसर-रामटेकडी येथील २३ एकर जागेत कचरा प्रकल्प होणे प्रस्तावित आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेतली होती. यावेळी मुक्ता टिळक यांनी या मुद्द्यावर लोकप्रतिनीधींशी चर्चा करुन तोडगा काढू, असे म्हटले होते.