News Flash

रुपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी

धमकी देणाऱ्याचं नाव जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीनं रुपाली चाकणकर यांना कार्यालयात तोडफोट करुन पेटवून देण्याची धमकी दिली आहे. जयंत पाटील हे सांगलीती तांबवे येथील रहिवाशी आहेत.

रुपाली चाकणकर यांचे धायरी येथे कार्यालय आहे. या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी सदर व्यक्तीनं फोन करुन कार्यालय पेटवून देतो अशी धमकी दिली. धमकीचा फोन आला तेव्हा रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या माघारी परतल्यानंतर सदर घडलेला प्रकार स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी रुपाली चाकणकर यांना सांगितला.

त्यानंतर चाकणकर यांनी सरळ सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन गाठलं. सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर सिंहगड पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 9:12 am

Web Title: ncp rupali chakankar threat phone call nck 90
Next Stories
1 करोना संशोधनाबाबत जागतिक स्तरावर देश पिछाडीवर
2 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
3 विभाजित स्वरूपात नष्ट व्हायचे का?
Just Now!
X