12 July 2020

News Flash

डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी

कोल्हे दिल्लीत खासदार म्हणून चांगले काम करत आहेत, असे पवार म्हणाले.

अजित पवार यांचे सूतोवाच

पिंपरी : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी निवडणुकीसाठी राज्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

डॉ. कोल्हे खासदार झाल्यापासून भोसरीत आले नसल्याच्या तक्रारींना उत्तर देताना ते आता शिरूरपुरते मर्यादित नसून त्यांचा राज्यासाठी विचार सुरू असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

लोकसभेतून निवडून गेल्यानंतर डॉ. कोल्हे भोसरी मतदारसंघात येत नसल्याच्या तक्रारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केल्या. त्याचा संदर्भ देत पवार यांनी पिंपळे गुरव येथील बैठकीत त्यांच्या शैलीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. आमदार-खासदार होऊन दारोदारी फिरायचे असते की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? कोल्हे दिल्लीत खासदार म्हणून चांगले काम करत आहेत, असे पवार म्हणाले.

शेतकऱ्यांचे, बैलगाडय़ांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक पंतप्रधानांनीही केले. आगामी निवडणूक काळात त्यांना शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्याबरोबरीने राज्यभर फिरायचे आहे.

त्यामुळे केवळ भोसरी-भोसरी करू नका. ते भोसरी किंवा शिरूरपुरते मर्यादित नाहीत. डॉ. कोल्हे यांना भोसरीत मताधिक्य मिळू शकले नाही. त्यांना २८ हजाराची पिछाडी होती. त्यामुळे त्यांना तरी भोसरीत कसे यावेसे वाटेल, अशी सूचक टिप्पणीही पवारांनी या वेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2019 5:00 am

Web Title: ncp to give huge responsibility to dr amol kolhe ajit pawar zws 70
Next Stories
1 शहरबात पिंपरी : भाजपच्या बालेकिल्ल्यात धुसफूस
2 सेवाध्यास : आश्वासक ‘स्पर्श’
3 दस्त नोंदणीची कागदपत्रे आता घरबसल्या ‘अपलोड’
Just Now!
X