28 February 2021

News Flash

नायजेरियन व्यक्तीच्या मारहाणीत महिलेचा गर्भपात

महिला बोलत नसल्याच्या रागातून तिला लाथ मारली

प्रतिनिधिक छायाचित्र

सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात एका नायजेरियन व्यक्तीच्या मारहाणीत महिलेचा गर्भपात झाल्याची घटना समोर आली आहे. दोघेही परदेशी असून आरोपी हा नायजेरियन आहे तर पीडित महिला ही युगांडातील राहणारी आहे. ती चार महिन्यांची गर्भवती होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला बोलत नसल्याचा राग मनात धरून आरोपीने तिच्या पोटावर लाथ मारली.  (फ्रेड बोहो वय-४० रा. पिंपळे गुरव मूळ- नायजेरियन) असे आरोपी चे नाव आहे. फ्रेडला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडा येथून शिक्षणासाठी आलेली ३३ वर्षीय महिला ही पिंपळे गुरव परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये एका व्यक्ती सोबत राहात होती. फ्रेड बोहो हा या महिलेची छेड काढत असे. गेल्या सहा महिन्यांपासून पीडितेशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ३३ वर्षीय महिला ही बोलण्यास टाळाटाळ करत होती. याच रागातून रस्त्यात या दोघांचे भांडण झाले. बोहोच्या रागाचा पारा चढला आणि त्याने या महिलेच्या पोटावर लाथ मारली. ज्यानंतर या महिलेचा गर्भपात झाला. आरोपी बोहोला संबंधित महिला ही चार महिन्याची गर्भवती होती अशी माहिती होती. तरीही बोहोने  जाणीवपूर्वक या महिलेच्या पोटावर लाथ मारली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 5:45 pm

Web Title: nigerian man beaten woman womans abortion after this police case registered in pimpri scj 81 kjp 91
Next Stories
1 पुणे: गॅस कटरने एटीएम फोडताना उडाला आगीचा भडका, आठ लाखांच्या नोटा जळून खाक
2 पुणे : मिळकतकर आणि पाणीपट्टीत वाढीची शक्यता; प्रस्तावित अंदाजपत्रक सादर
3 गदा पैलवानांच्या खांद्यावर शोभते, इतरांच्या नाही ! पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांची फटकेबाजी
Just Now!
X