05 December 2020

News Flash

पुणे पदवीधर, शिक्षक मतदानासाठी नऊ प्रकारची कागदपत्रे ग्राह्य़

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल, तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित कराव्यात.

(संग्रहित छायाचित्र)

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्र  (ईपीआयसी) सादर करू न शकणाऱ्या मतदाराचे आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड आणि पारपत्र आदी नऊ कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत.

या कागदपत्रांबरोबरच केंद्र व राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी औद्योगिक घराणे यांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र, खासदार किंवा आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरित पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र ही कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य़ धरण्यात येतील, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल, तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित कराव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे किंवा पटवणे शक्य नसल्यास मतदाराला वरील पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, याची सर्व मतदान के ंद्र अध्यक्षांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:10 am

Web Title: nine types of documents accepted for pune graduate teacher voting abn 97
Next Stories
1 राज्यभरात घरखरेदीची दिवाळी!
2 पाणी मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध
3 आफ्रिकेतील मालावी हापूस बाजारात
Just Now!
X