एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात मागील महिन्याभरापासून देशभरात अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहे. दरम्यान दिल्ली येथील शाहीन बागमध्ये महिला वर्ग देखील ठिय्या मांडून आंदोलन सुरू आहे. त्या महिलांच्या समर्थनार्थ काल पुण्यातील संभाजी बागेच्या बाहेरील फुटपाथवर सायंकाळपासून स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती, अन्नपूर्णा परिवार, हम भारत के लोग के साथ या संघटनेचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठय़ा संख्येने बसले आहे. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. सायंकाळच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन, सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.