अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. खडकी बाजार परिसरात गुरुवारी (२ जून) ही घटना घडली.
फय्याज इब्राहिम शेख (वय २८, रा. एलफिस्टन रस्ता, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी सदाशिव कुलकर्णी यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील एलफिस्टन रस्ता परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मोहीम गुरुवारी राबविण्यात आली.
तेथे शेख याच्या अनधिकृत हातगाडीवर कारवाई करण्यात आली. शेख याने कुलकर्णी यांना शिवीगाळ केली तसेच लाकडी दांडके घेऊन तो कुलकर्णी यांच्या अंगावर धावून गेला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रक रणी शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. सहायक पोलीस फौजदार बुधकर तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2016 रोजी प्रकाशित
खडकीत अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवीगाळ
फय्याज इब्राहिम शेख (वय २८, रा. एलफिस्टन रस्ता, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 05-06-2016 at 00:09 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officer abused for taking action against encroachment