21 September 2020

News Flash

कोथरूडमध्ये आगीत वृद्धेचा मृत्यू

पुण्याच्या कोथरूड भागातील एका इमारतीला लागलेल्या आगीत सोमवारी सकाळी एका वृद्ध महिलेचा बळी गेला.

| December 22, 2014 11:01 am

पुण्याच्या कोथरूड भागातील एका इमारतीला लागलेल्या आगीत सोमवारी सकाळी एका वृद्ध महिलेचा बळी गेला. आगीच्या धुरामुळे गुदमरून या महिलेचा मृत्यू झाल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले. आगीमध्ये आणखी एकाला ६० टक्क्यांपर्यंत भाजले आहे.
कोथरूडमधील महात्मा सोसायटीमध्ये असलेल्या एका इमारतीला सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. त्याबद्दल माहिती मिळाल्यावर लगेचच कोथरूडमधील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा फवारा करण्यास सुरूवात केली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक तरुणी असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शिडीच्या साह्याने तेथून बाहेर काढले. त्याचवेळी तळमजल्यावर एका खोलीत अंदाजे ६० वर्षे वयाची वृद्ध महिला बेशुद्ध असल्याचे दिसल्यानंतर त्यांनाही बाहेर काढण्यात आले. अग्निशामक दलाचे दोन बंब आणि टॅंकरच्या साह्याने आग पूर्ण आटोक्यात आणण्यात आली असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 11:01 am

Web Title: older women dead in pune due to fire
टॅग Fire
Next Stories
1 ‘प्रभात’ची अखेर चार दिवसांवर
2 सत्तावीस तारखेला ‘पासपोर्ट मेळा’
3 स्वातंत्र्याचे मूल्य जाणून घ्यायला हवे – मेघना पेठे
Just Now!
X