पुणे : महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाने मार्च अखेरपर्यंत एकू ण १०० कोटी रुपयांची थकीत रक्कम वसूल के ली आहे. यातील ३० कोटी रुपये अवघ्या मार्च महिन्यात मिळाले असून थकबाकी वसुलीची मोहीम पाणीपुरवठा विभागाकडून नव्या आर्थिक वर्षातही कामय ठेवण्यात येणार आहे.

शहरातील विविध संस्था, गृहनिर्माण सोसायट्या, सरकारी कार्यालयांना महापालिके कडून पाणीपुरवठा के ला जातो. या आस्थापनांकडे तब्बल पाचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील १०० कोटी रुपये महापालिके ने ३१ मार्च अखेरपर्यंत वसूल के ले आहेत, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले. पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा बजाविण्यात येत असून थकबाकी न भरणाऱ्यांचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

शहरात ४० हजार व्यावसायिक आस्थापनांना जलमापकांद्वारे (मीटर) पाणीपुरवठा के ला जातो. जलमापकापोटीची थकबाकी ५०० कोटींपर्यंत गेली आहे. यात दुबार आकारणीबरोबरच चुकीची आकारणी, जलमापक नसतानाही केलेल्या आकारणीचा समावेश आहे. त्यामुळे यातील काही थकबाकीची रक्कम निर्लेखित करण्यात येणार आहे. मात्र अन्य व्यावासयिकांनी थकबाकीची रक्कम भरली नसल्यामुळे कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिली.