News Flash

वाकडसह चार ठिकाणी ‘वन रुपी क्लिनिक’

या क्लिनिकमध्ये तपासणी फी केवळ एक रुपया द्यावी लागते.

मुंबईत सात रेल्वे स्टेशनवर सुरू झालेली ‘वन रुपी क्लिनिक’ आता पुण्यात वाकडसह चार ठिकाणी चालवली जाणार आहेत. या क्लिनिकमध्ये डॉक्टरांकडून तपासून घेण्यासाठी केवळ एक रुपया फी घेतली जाणार आहे. वाकडमध्ये गुरुवारी हे क्लिनिक सुरू होणार असून तिथे एमबीबीएस व मधुमेहतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरची नियुक्ती केली आहे.

ही सुविधा पुरवणाऱ्या खासगी संस्थेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी ही माहिती दिली. ‘‘वाकडमधील दत्तमंदिर रस्ता येथे ‘वन रुपी क्लिनिक’बरोबर औषधविक्री व काही वैद्यकीय चाचण्याही सुरू करण्यात येणार असून अद्याप त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी मिळणे बाकी आहे. त्यानंतर लगेच ही सुविधा सुरू होईल. पुण्यात कोंढवा, ससाणेनगर आणि चंदननगर रस्त्यावरही वन रुपी क्लिनिक सुरू करणार आहोत,’’ असे घुले यांनी सांगितले.

या क्लिनिकमध्ये तपासणी फी केवळ एक रुपया द्यावी लागते. रक्तदाब तपासणी मोफत असून रक्तातील साखरेची तपासणी २५ रुपयांत आणि ईसीजी चाचणी ५० रुपयांत केली जाते. रक्तचाचण्यांवर जवळपास ४० टक्के आणि औषधांवर १० ते २० टक्के सूट दिली जाते.

‘‘मुंबईतील वन रुपी क्लिनिक्सना चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन महिन्यांत १७ हजार रुग्णांची तिथे तपासणी झाली. अनेक रुग्ण रोज कामाला जाताना व आल्यावर मोफत रक्तदाब तपासून जातात. आम्ही रेल्वे स्थानकांवर हृदयविकाराचा झटका येण्याच्या स्थितीतील तीन रुग्णांना तातडीची सेवा दिली, तसेच एका महिलेची प्रसूती करण्यात आली. या क्लिनिकबरोबर औषधविक्री व चाचण्याही करून दिल्या जात असल्यामुळे क्लिनिक चालवण्यासाठी लागणारा खर्च त्यातून भरून निघतो. आमच्याच औषध दुकानातून औषधे घेण्याची किंवा चाचण्या करून घेण्याची सक्ती नाही,’’ असे डॉ. घुले यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 3:15 am

Web Title: one rupee clinic in pune also
Next Stories
1 काळ्या यादीत ३ ठेकेदार
2 ब्रॅण्ड पुणे : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणारी महात्मा फुले मंडई
3 पुण्यात एचआयव्ही बाधितांना मोफत बससेवा मिळणार : तुकाराम मुंढे
Just Now!
X