जनतेला किफायतशीर खर्चामध्ये उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेलने काम करावे, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली.
पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर्स सेलतर्फे ‘डॉक्टर्स डे’निमित्त आयोजित कार्यक्रमात माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते डॉ. पराग संचेती, डॉ. सपना बंब, डॉ. माणिकराव पाटील, डॉ. सुनील पायगुडे, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. सी. जी. पेशवे, डॉ. एन. पी. राव, डॉ. संजय मानकर, डॉ. गणेश राख आणि डॉ. धर्मेद्र शर्मा या डॉक्टरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. महिला काँग्रसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष अभय छाजेड, नगरसेवक संजय बालगुडे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज राका, डॉ. स्नेहल पाडळे, डॉ. सबिहा पटेल या प्रसंगी उपस्थित होत्या. उत्तरार्धात ‘पती सारे उचापती’ या नाटकाचा प्रयोग झाला.
माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या विविध समस्यांसंदर्भात आरोग्य खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ. मनोज राका यांनी सांगितले. डॉ. अंबालाल पाटील, डॉ. मंगेश शिंदे, डॉ. जिग्नेश तासवाला, डॉ. पंकज शहा, डॉ. रवींद्र सोनार, डॉ. भालचंद्र गायकवाड, डॉ. अजय रोकडे, डॉ. हितेश सोळंकी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.