25 February 2021

News Flash

हिंजवडी जवळच्या खाणीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

शिवदुर्गच्या बचाव पथकाने मृतदेह काढला शोधून

Hinjewadi : खाणीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेताना शोध पथक.

हिंजवडीलगतच्या मारुंजी येथील खाणीत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिवशंकर रेड्डी (वय २६, मूळ रा. कडप्पा, आंध्रप्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिवशंकर रेड्डी त्याच्या काही मित्रांसोबत पोहायला आला होता. मारुंजी येथे हिंजवडीजवळ खाणीमध्ये पोहताना अचानक तो पाण्यात गायब झाला. त्यानंतर आज सकाळी शिवदुर्गच्या बचाव पथकाला ही घटना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी शिवशंकरची शोध मोहीम सुरु केली. अखेर बचाव पथकाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी ४ वाजता शिवशंकरचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 5:53 pm

Web Title: one youngster drawn at water mine near hinjewadi during swimming with his friend
Next Stories
1 ‘जीएसटी’ म्हणजे कर दहशतवाद : पी. चिदंबरम
2 झाडे लावली आणि ती यशस्वीपणे जोपासलीही
3 समान पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
Just Now!
X