खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर कोणत्याही निवडणुकीत पद मिळवण्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. त्या निवडणुकामध्ये पराभूत झाल्यानंतर कार्यकर्त्यांना योग्य वागणूक दिली जात नाही, असे होता कामा नये. कार्यकर्ते आपले घरगडी नसून त्यांना योग्य मानसन्मान द्या. मी पैसे दिले, खर्च केला, काम केलं हे सांगू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात नेत्यांचे कान टोचले. दरम्यान, अजित पवारांनी भाजपवर सडकून टीका केली.

पवार म्हणाले, लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपाला भरभरून मते देत त्यांच्या हाती सत्ता दिली. मात्र, या चार वर्षांच्या काळात शहराचा एकही प्रश्न मार्गी लागला नसून यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे भाजपाच्या एकाही नेत्याचे लक्ष नाही, अशा शब्दांत भाजपाच्या नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला.

आगामी निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याची गरज असून प्रत्येकाने प्रत्येक बुथ निहाय २५ नागरिक तयार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच मेट्रोच्या कामाबाबत प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मेट्रोचा एक खांब निकृष्ट कामामुळे पाडण्यात आला होता. आताच अशी परिस्थिती असल्यास मेट्रो धावल्यानंतर काय होईल, अशा शब्दांत भाजपाच्या कामावर त्यांनी टीका केली.
विद्यार्थ्यांनो अपयश आले म्हणून चुकीचे पाऊल उचलू नका : अजित पवार</p>

दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत अपयश आले म्हणून विद्यार्थी वर्गाने कोणत्याही प्रकारे चुकीचे पाऊल उचलू नये. अपयश आले म्हणजे सर्व संपले असे होत नाही. तो विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी पुढील तयारीसाठी सज्ज होण्याची गरज आहे. तसेच त्याही पेक्षा आजवर अनेक मोठे व्यक्ती तुम्ही पाहिले असतील. त्यांना देखील जीवनाच्या सुरुवातीला अपयश आले आणि ते पुढील प्रयत्नात यशस्वी ठरल्याचे अनेक उदाहरण असल्याचे अजित पवार यांनी सांगत विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले.