News Flash

पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

अात्महत्येचे कारण अस्पष्ट

ससून रूग्णालयाचे संग्रहित छायाचित्र

पुण्यातील ससून रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील स्टोअर रुममधील जाळीला बेडशीट बांधून रुग्णाने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील योगेश कांबळे (वय ४०) हे २८ फेब्रुवारी रोजी एका ठिकाणी वीजजोडणीचे काम करत असताना शॉर्टसर्किट झाला. यात योगेश कांबळे ३० ते ३५ टक्के भाजले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून कांबळे यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी वॉर्ड क्रमांक २५ मधील स्टोअर रूममधील जाळीला बेडशीट बांधून गळफास घेतला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेचा बंडगार्डन पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 7:48 pm

Web Title: patient hangs himself sasoon hospital in pune
Next Stories
1 पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचा गटनेता आणि शहराध्यक्ष उद्या ठरणार!
2 प्रेमभंगातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
3 पिंपरी-चिंचवडमध्ये बस-दुचाकीची समोरासमोर धडक; तरुण ठार
Just Now!
X