पुणे : सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी परिधान न के ल्याने नांदेडचे आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावर महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दंडात्मक कारवाई के ली.

शहरासह जिल्ह्य़ात सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुरुवारी महापालिके च्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कोथरुड पोलीस ठाण्याचे कर्मचारी शास्त्रीनगर चौकात मुखपट्टी परिधान न के लेल्या नागरिकांवर कारवाई करत होते.

सकाळी साडेअकराच्या सुमारास चारचाकी वाहनातून आमदार राजूरकर चार मित्रांसह मुखपट्टी परिधान न करता प्रवास करत होते. ही बाब महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी थांबवण्याचा इशारा के ला. मात्र, वाहन चालकाने गाडी थांबवली नाही.

पोलिसांनी पाठलाग करुन गाडी थांबवली आणि राजूरकर यांच्यावर मुखपट्टी परिधान न के ल्याबद्दल पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई के ली. प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींवर देखील मुखपट्टी परिधान न के ल्याने झालेली कारवाई शहरात दिवसभर चर्चेचा विषय ठरली. या कारवाईमळे पालिका व पोलिसांचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.