22 November 2019

News Flash

पिंपरीतील शीतळादेवीचा चांदीचा मुकूट आणि दानपेटी चोरांनी पळवली

सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली

गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. आता मंदिरे सुरक्षित राहिली नसल्याचे दिसत आहे. पिंपरी येथील शीतळादेवी मंदिरात अज्ञात दोन चोरांनी दानपेटी आणि देवीचा चांदीचा मुकूट चोरला आहे.  याप्रकरणी रोहन नंदकुमार हराळे यांनी फिर्याद दिली असून १५ हजार रुपयांचा चांदीचा मुकूट आहे. दरम्यान, सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे पिंपरी पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील शितळादेवी मंदिरात अज्ञात दोन चोरांनी टेहळणी करून मंदिरातील दानपेटी आणि चांदीचा मुकूट पळवला आहे.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुचाकीवरून दोन जण आलेल्या पैकी एकाने अगोदर मंदिर परिसरात पाहणी केली आणि त्यानंतर मुख्य मंदिराच्या दरवाजाची कडी आणि कोयंडा तोडून आत प्रवेश करत दानपेटी आणि १५ हजार रुपयांचा चांदीचा मुकूट लंपास केला आहे. चोरी केल्यानंतर दोघे जण दुचाकीवरून फरार झाले आहेत. सदर घेटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकम हे करत आहेत

First Published on July 16, 2019 11:21 am

Web Title: pimpri chinchwad shitala devi temple robbery cctv nck 90
Just Now!
X