News Flash

पिंपरी-चिंचवडमधील तीन करोना बाधितांचा अहवाल निगेटिव्ह

दुसऱ्या वेळेस अहवाल निगेटिव्ह आल्यास डिस्चार्ज देण्यात येणार

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदा तीन करोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात गेल्या १४ दिवसांपासून उपचार सुरू आहेत. उपचारानंतर या तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आज पुन्हा पुण्यातील एनआयव्हीमध्ये घशातील द्रव्याचे नमूने पाठवले जातील. अहवाल हा निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असं महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं.
पुण्यातील डिस्चार्ज देण्यात आलेल्या दाम्पत्याबरोबर हे तिघे दुबईला गेले होते. त्यानंतर संबंधित दाम्पत्य हे करोना बाधित असल्याचं समोर आलं. त्याचबरोबर १० मार्चला तिघांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या घशातील द्रव्यांचे नमूने पुण्यात एनआयव्हीला पाठविण्यात आले. त्यात ते करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आयसोलेशन विभागात तिघांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, डॉक्टरांच्या १४ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालात तिघेही निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. परंतु, त्यांची आणखी एक चाचणी होणार असून त्याचा अहवाल रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी येणार असल्याची माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यांचा अहवाल हा पुन्हा निगेटिव्ह आला तर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 11:44 am

Web Title: pimpri chinchwad three corona affected people report negative kjp 91 jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्यात सर्व ठिकाणी पावसाचा अंदाज
2 करोना व्हायरस : पुण्यातील  तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह, उद्या डिस्चार्ज दिला जाणार : महापौर मुरलीधर मोहोळ
3 महाराष्ट्रातले पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी
Just Now!
X