News Flash

VIDEO: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच; आठ वाहन फोडली

गुरुवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात समाजकंटकांनी चिंचवडमधील मोहननगर येथे दोन रिक्षा आणि चारचाकी वाहनांची कोयत्याने तोडफोड केली.

चिंचवडमधील मोहननगर येथे दोन रिक्षा आणि चारचाकी वाहनांची कोयत्याने तोडफोड केली.

पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या समाजकंटकांनी परिसरात वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.

गुरुवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात समाजकंटकांनी चिंचवडमधील मोहननगर येथे दोन रिक्षा आणि चारचाकी वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच आहेत. समाजकंटकांवर लगाम लावण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 4:21 pm

Web Title: pimpri chinchwad unknown personal vandalize vehicles
Next Stories
1 पिंपरीत १४ वर्षांच्या मुलीवर पित्याचा बलात्कार, शेजारी राहणाऱ्या महिलेमुळे फुटली वाचा
2 नवे रेल्वे टर्मिनस कधी?
3 लोकजागर : पीएमपीची लक्तरे
Just Now!
X