भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात तब्बल १२ जिवंत काडतुसे आणि तीन देशी बनावटीचे पिस्टल दोघांकडून जप्त केले आहेत.त्यांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.यातील एक आरोपी परराज्यातील असून त्याच्याकडून ८ जिवंत काडतुसे आणि २ पिस्टल जप्त केले आहेत. मोहन सुभाष कोळी वय-२१ रा.चाकण आणि रामप्रसाद संतोष सोलंकी वय-१९ रा.मध्यप्रदेश अस अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.दोघांकडून ऐकून १२ जीवनात काडतुसे आणि ३ देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,यातील आरोपी मोहन सुभाष कोळी हा मोशी परिसरातील टोलनाक्याजवळ पिस्टल विक्री करण्यास येणार असल्याची खातरेशीर माहिती भोसरी एमआयडीसी पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार मोशी टोलनाक्याजवळ सापळा रचून मोहन सुभाष कोळी याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली.

आरोपी मोहन सुभाष कोळी याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पाच दिवसांनी परराज्यातील आरोपी रामप्रसाद संतोष सोलंकी हा पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली.त्याला पोलिसांनी मोशी परिसरातून ताब्यात घेतले त्याच्याकडून ऐकून २ देशी बनावटीचे पिस्टल आणि ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.परराज्यातून मोशी परिसरात कोणाला पिस्टल विक्री करण्यासाठी आरोपी आला होता याचा तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

ही कामगिरी झोन एक च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेडगे,सहा-फौजदार सुरेश चौधरी,पोलीस हवालदार रवींद्र तिटकारे यांनी केली.