पिंपरीतील आरटीओच्या एका अधिकाऱ्यास प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले असून संबंधित अधिकाऱ्याने परवाना देण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.
पिंपरीतील मोटार वाहन निरीक्षक सिद्धीराम पांढरे हे परवाना देण्यासाठी पैसे घेतात आणि यासाठी त्यांनी एक माणूस नेमला आहे, असा प्रहार संघटनेचा आरोप आहे. आरटीओचे मुख्याधिकारी आनंद पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करून त्यांनी याची दखल घेतली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.
शुक्रवारी दुपारी संघटनेचे स्थानिक नेते गौतम सुराडकर व अन्य कार्यकर्त्यांनी आरटीओ कार्यालयात प्रवेश केला. सिद्धीराम पांढरे हे एका चालकाची चाचणी घेत असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठले. कार्यकर्त्यांनी वाहनात बसलेल्या पांढरे यांच्या तोंडाला काळे फासले. याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहे. प्रहार संघटनेने केलेल्या आरोपांबाबत आरटीओचे मुख्य अधिकारी आनंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
पाहा या घटनेचा व्हिडिओ
पुणे: प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यानी आरटीओ च्या अधिकाऱ्याला काळे फासले.https://t.co/ZfyIjgJO7V
अधिकारी परवाना देण्यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. pic.twitter.com/mBaqHXEArY— LoksattaLive (@LoksattaLive) August 24, 2018
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 4:31 pm