29 October 2020

News Flash

निगडीत व्यावसायिक वादातून वाहनांची तोडफोड

तीन दुचाकीवरून आलेल्या आठ जणांनी रस्त्यावर अक्षरश: धुडगूस घालत पार्क केलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना लक्ष्य केले.

पिंपरी- चिंचवड शहरातील निगडी परिसरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने भरदिवसा पाच वाहनांची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. साईनाथ नगर येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा तपास निगडी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ नगर येथे कानिफनाथ आणि रुपरजत नावाचे मेडिकल आहे, यावरूनच हा वाद झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी कानिफनाथ या मेडिकल चा पहिलाच दिवस होता. त्यानंतर ही तोडफोड झाली यात कानिफनाथ मेडिकल मालकाच्या चारचाकी गाडीचा समावेश आहे.

तीन दुचाकीवरून आलेल्या आठ जणांनी रस्त्यावर अक्षरश: धुडगूस घालत पार्क केलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना लक्ष्य केले. यात तीन दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. दुचाकीवरुन आलेले हल्लेखोर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेचा तपास निगडी पोलीस करत आहेत.पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 7:35 pm

Web Title: pimpri unknown person vandalizes five vehicles in nigdi
Next Stories
1 पुणे – सेक्स करण्यास नकार दिल्याने समलैंगिक पार्टनरवर कोयत्याने हल्ला
2 पुणे हिट अँड रन: आजी नातवाच्या मृत्यूप्रकरणी महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाला अटक
3 रेल्वेत चहा, कॉफी महागली
Just Now!
X