पुणे महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर महापालिकेतील राष्ट्रवादीचा गटनेता आणि रिक्त झालेल्या शहराध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागते, याचा निर्णय उद्या, रविवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. त्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहेत.

पुणे महापालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता होती. पण यंदाच्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला. आता राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत राष्ट्रवादीचा गटनेत्याची निवड केली जाणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून वंदना चव्हाण यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होती. या रिक्त पदासाठीही निवड केली जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत गटनेता आणि पुणे शहराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार हेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?

पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे मोदी लाट दिसून आली आहे. यंदाच्या महापालिकेच्या १६२ जागांपैकी ९८ जागी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ४०, काँग्रेस ११, शिवसेना १०, मनसे दोन आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला आहे. आता यानंतर प्रत्येक पक्षाच्या वतीने गटनेता निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामध्ये शिवसेनेने नगरसेवक संजय भोसले यांची दोन दिवसापूर्वीच निवड केली असून राष्ट्रवादीनेही गटनेता आणि शहर अध्यक्षपदाच्या निवडीला गती दिली आहे. या गटनेतापदासाठी नगरसेवक चेतन तुपे, विशाल तांबे, प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, बाबुराव चांदेरे आणि दीपक मानकर हे इच्छुक असून शहर अध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक दीपक मानकर, दिलीप बहाटे आणि आप्पा रेणुसे हे इछुक आहेत. या पदासाठी शरद पवार कोणाची निवड करतात, याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार काय बोलणार?

महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यपध्दतीवर अजित पवार यांनी जोरदार टीका केली होती. मात्र, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे पुण्यात होणाऱ्या बैठकीत ते काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

<