प्रोत्साहन भत्त्यामध्ये दरमहा घरटी १० रुपयांची वाढ प्रस्तावित

पुणे : शहरातील घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या कचरावेचकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे. प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत आंदोलने के ली होती. या आंदोलनानंतर जाग्या झालेल्या महापालिके च्या स्थायी समितीमध्ये या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्यात आली. त्यामुळे स्वच्छ कचरा सेवकांना प्रती घरटी प्रती महिना १० रुपयांऐवजी २० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. पुढील सहा महिन्यांसाठी हा भत्ता देण्यात येणार आहे.

करोना संकटाच्या काळात स्वच्छ संस्थेच्या ३ हजार ४०० कचरावेचकांनी कचरा संकलन करण्याचे काम यशस्वीपणे के ले होते. टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक बंद असताना, सोसायटय़ांकडून इशारे दिले जात असताना आणि पोलिसांची अरेरावी सहन करत कचरा संकलनाची अखंडित सेवा कचरावेचकांकडून देण्यात आली. सध्याही हे काम निरंतर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रोत्साहन भत्ता घरटी दहा रुपयांवरून २० रुपये करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता.

वस्ती पातळीवर घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या कचरावेचकांना महापालिके कडून प्रत्येक घरामागे १० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. हा भत्ता १० रुपयांवरून २० रुपये करण्यात येणार आहे. त्यानुसार २० रुपये प्रतिघर प्रतिमहिना या प्रमाणे पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी भत्ता दिला जाणार आहे. पुनर्वसन के लेल्या झोपडय़ा तसेच अघोषित झोपडपट्टी क्षेत्रासही तो लागू राहणार आहे.

हा प्रस्ताव मान्य करण्यासंदर्भात स्वच्छ संस्थेचे पदाधिकारी महापालिके तील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटले होते. मात्र प्रस्ताव मान्य होत नसल्यामुळे स्वच्छ सेवकांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. महापालिका भवनापुढे थाळी वाजवा आंदोलनही करण्यात आले होत. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.