तीन वर्षांत १२५ कोटींचा खर्च

पुणे : पदपथ विकसनाच्या नावाखाली महापालिके च्या पथ विभागाने गेल्या तीन वर्षांत तब्बल १२५ कोटी रुपयांचा खर्च के ला आहे. मात्र त्यानंतरही शहरातील पदपथ पादचाऱ्यांच्या दृष्टीने निरुपयोगी ठरत असल्याची वस्तुस्थिती आहे. पदपथांवरून वाहने दामटण्याचे प्रकार, विविध प्रकारची अतिक्रमणे अशा विविध कारणांमुळे पदपथांवरून चालणे पादचाऱ्यांसाठी असुरक्षित ठरत असतानाच शहराच्या काही भागांत पदपथच अस्तित्वात नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे पदपथांवरील हा खर्च के वळ उधळपट्टी ठरत आहे.

महापालिकेने पादचारी सुरक्षितता धोरणाला मान्यता दिली आहे. त्यानुसार पदपथ प्रशस्त असावेत, ते विना अडथळा असावेत, अशी नियमावली तयार केली आहे. प्रत्यक्षात बहुतांश पदपथांवर नानाविध अतिक्रमणे झाली आहेत. शहरातील पादचारी असुरक्षित असल्याचे चित्र असतानाच पदपथांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिकेला के वळ पदपथ विकसनाच्या नावाखाली उधळपट्टी करण्यातच रस असल्याचे दिसून येत आहे. पादचाऱ्यांच्या नावाखाली काही ठरावीक पदपथांवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी होत असतानाच पदपथ नसल्याच्या या विसंगतीमुळे पादचाऱ्यांबाबत महापालिका आणि सत्ताधारी पक्ष किती असंवेदनशील आहे, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले असून पदपथांच्या दुरुस्ती आणि पदपथ विकसित करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी नक्की मुरतो कुठे हा प्रश्नही कायम राहिला आहे.

महापालिके ने गेल्या तीन वर्षांत पदपथ विकसनासाठी पथ विभागाने तब्बल १२५ कोटी रुपये खर्च के ले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रीय कार्यालयेही पदपथ विकसनासाठी खर्च करण्यात आघाडीवर आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडून वर्षांला किमान तीन कोटी रुपयांचा खर्च हा पदपथांच्या दुरुस्तीवर के ला जातो. त्यानंतरही पदपथांवरून मुक्तपणे चालणे पादचाऱ्यांना शक्य होत नाही.

तीन वर्षांतील खर्च

वर्ष                      खर्च

२०१७-१८              ४९ कोटी ९ लाख ७० हजार

२०१८-१९              ६२ कोटी २६ लाख ७६ हजार

२०१९-२०              १२ कोटी ८८ लाख (ऑक्टोबर अखेपर्यंत)

कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी   २.९

 

प्रभागाचे नाव        पदपथ नसलेल्या  रस्त्यांची टक्केवारी

जनता वसाहत-दत्तवाडी        २०.६

वडगांव धायरी-सनसिटी         १७.६

कळस-धानोरी                        १४.७

बावधन-कोथरूड डेपो               ११.८

धनकवडी-आंबेगाव पठार         ११.८

आंबेगाव दत्तनगर-कात्रज        ८.८

मयूर कॉलनी-                          ५.९

बाणेर-बालेवाडी-पाषाण           ५.९

पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे, यासाठी पदपथांचे विकसन करण्यात येते. त्याद्वारे पादचाऱ्यांना सुविधा देण्यात येत आहेत. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पदपथ प्रशस्त करण्यात येत आहेत.

– व्ही. जी. कु लकर्णी, पथ विभाग प्रमुख