िपपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार पाहता शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शासन दरबारी देखील त्यादृष्टीने सकारात्मक पाऊले टाकली जात आहेत. या नियोजित पोलीस आयुक्तालयासाठी िपपरी प्राधिकरणाची सध्याची इमारत वापरता येईल का, यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर चाचपणी सुरू आहे.

िपपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जवळपास ६० कोटी रूपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी ही सात मजली इमारत बांधली आहे. पर्यावरणभिमुख असे इमारतीचे बांधकाम आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या इमारतीचा काही भाग अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी देण्यात आला आहे. प्राधिकरणाचे कामकाज येथून चालत असले तरी जवळपास पाच मजले पूर्णपणे रिकामे आहेत. या ठिकाणी पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची मागणी शहरातील काही भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली होती. त्यानंतर प्राधिकरण प्रशासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. शासकीय पातळीवर याबाबतची व्यवहार्यता तपासण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.