पुणे म्हणजे वाहनांची वर्दळ असलेले शहर….शहरातली वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी नित्याचीच….शुक्रवारी कर्वे रोड या गजबजलेल्या रस्त्यावरील वाहतूक मंदावली पण यासाठी कारणीभूत ठरली ती मोठ्या पडद्यावर झळकलेली पॉर्न फिल्म.
कर्वे रोडवर शुक्रवारी नेहमीप्रमामे वाहनांची वर्दळ सुरु होती. रस्त्यावर लागलेल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक फलकावर नेहमीप्रमाणे सुचना आणि जाहिराती सुरु होत्या. मात्र अचानक या फलकावर चक्क पोर्नवेबसाईटवरील पोर्न क्लिपच झळकली. पडद्यावर पॉर्न क्लिप लागल्याने वाहतुकीचा वेग मात्र मंदावला. प्रत्येकाच्या नजरा या फलकाकडे वळल्या. कोणी आश्चर्याने तर कोणी सर्वांच्या नजरा चुकवून या फलकाकडे बघत होते. भरपावसात रस्त्याच्या मधोमध छत्री घेऊन चालणारा एक पादचारी थांबून पॉर्नक्लिप बघू लागला. एका ट्विटवर युजरने कर्वेरोडवरील हा फोटो अपलोड केला आणि अवघ्या काही तासांमध्येच संपूर्ण महाराष्ट्रात हा फोटो व्हायरल झाला.


जाहिरात फलकावर पॉर्न क्लिप कशी झळकली याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फलकाची जबाबदारी असलेल्या ऑपरेटरने फलकाची वायर चुकून एका कॉम्प्यूटरशी जोडली. त्यामुळे कॉम्प्यूटरवर सुरु असलेली पॉर्न क्लिप या फलकावर झळकली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी चुकून पॉर्नक्लिप झळकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी केरळमधील एका बस स्थानकावरही पॉर्नक्लिप लावण्यात आली होती. कॉम्प्यूटर ऑपरेटरने भलताच पेनड्राईव्ह लावला आणि त्या पेनड्राईव्हमधील पॉर्नक्लिप बस स्टँडमधील मोठ्या पडद्यावर झळकली होती.