सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे या भागात करोना व्हायरस झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भविष्यात रुग्ण संख्या कमी न झाल्यास परिस्थितीचा आढावा घेऊन कंटेन्मेंट झोन करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “मागील आठ दिवसात दररोज साधारण 300 च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे भागातील रुग्ण अधिक आहे. हे लक्षात घेता, तिथे तपासण्या करण्यावर भर दिला जाणार आहे.”
आणखी वाचा- … तर पुढील १० दिवसांत कठोर निर्णय घेऊ; मुंबईकरांना महापालिकेचा इशारा
“पुणे शहरात 1300 वरुन सक्रिय रुग्णाची संख्या 1700 झाली आहे. तर बाधित रुग्णांची टक्केवारी 4.6 वरुन 12 वर गेली आहे. त्यामुळे महापालिका तपासण्या वाढवणार असून नायडू, बाणेर, खेडेकर,ससून रुग्णालयात 1163 बेड उपलब्ध आहेत. तर खाजगी रुग्णालयात 3 हजार बेडस उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. मात्र मास्क लावून आणि सोशल डिस्टंन्सिंगचा वापरा करावा” असे आवाहन त्यांनी केले.