प्राध्यापक डॉ. विजय देव यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. ख्यातनाम लेखक गो. नी. दांडेकर यांचे ते जावई तर प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिचे ते वडील होते.
विजय देव यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. देव यांच्या पश्चात पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, मृणाल कुलकर्णी व मधुरा या दोन कन्या असा परिवार आहे. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी देव यांची ओळख होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 12:19 pm
Web Title: professor vijay dev passes away