पुणे : भाडेकराराची ऑनलाइन नोंदणी करण्याऐवजी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संके तस्थळावर आधार क्रमांकाच्या आधारे मोबाइलवरुन के वळ वन टाइम पासवर्डद्वारे (ओटीपी) भाडेकराराची नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या विधी व न्याय विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीनेच भाडेकरार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

महसूल विभागाने याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संके तस्थळावर ‘लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स’ या पर्यायावर जाऊन घरमालक आणि भाडेकरू यांनी आधारक्रमांक आणि अन्य माहिती भरल्यानंतर त्यांना मोबाइलवर ओटीपी दिला जाणार होता. त्याद्वारे भाडेकराराची नोंदणी करण्यात येणार होती. या नवीन पद्धतीच्या अंमलबजावणीपूर्वी राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्र भाडेकरू अधिनियम १९९९ च्या तरतुदीनुसार हा प्रस्ताव नसल्याने राज्याच्या विधी व न्याय विभागाने तो फे टाळला आहे. परिणामी प्रचलित पद्धतीप्रमाणेच भाडेकराराची नोंदणी के ली जाणार आहे.

भाडेकरारासाठी नोंदणी कार्यालय किं वा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नेमलेल्या ऑनलाइन नोंदणी के ंद्रावर जावे लागते. घरमालक आणि भाडेकरू यांच्या हाताचे ठसे आणि फोटो घेण्यात येतात. त्यानंतर भाडेकराराची नोंद भाडेकरार अभिलेखांमध्ये के ली जाते. नव्या प्रस्तावात घरबसल्या घरमालक आणि भाडेकरू यांना मोबाइलवरुन ओटीपीद्वारे नोंदणी करता येईल, असे नमूद के ले होते. महसूल विभागाने हा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठवला होता. मात्र, या प्रस्तावाच्या कायदेशीर बाबी तपासण्यासाठी हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला. या विभागाने या प्रस्तावाला नकार दिला असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

आधार क्रमांकाच्या आधारे मोबाइलवरुन भाडेकरार करण्याबाबतचा प्रस्ताव होता. मात्र, राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा प्रस्ताव नाकारला आहे. परिणामी या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येणार नाही.

– ओमप्रकाश देशमुख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक