पुण्यातील कोंढवा परिसरातील एक तरुण काही व्यक्तीकडे उधारीवर पैसे मागत असे आणि त्याला काही जण पैसे द्यायचे. पैसे परत मागितल्यानंतर अनेक वेळा वादाचे प्रकार घडले होते. असाच प्रकार काल रात्री घडला. त्या वादातून घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलीस करीत आहे.
खडया ऊर्फ शाहरुख मनसुख हसन (१९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील फरशी मैदानाजवळ असणार्या शिवनेरी नगरमधील गल्ली क्रमांक नऊ मध्ये काल मध्यरात्री खडया ऊर्फ शाहरुख मनसुख हसन याचा काही व्यक्तीशी वाद झाला. त्या दरम्यान तिघा चौघांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले.
त्यानंतर डोक्यात दगड घातला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गंभीर जखमी झालेल्या तरुणाला जवळील रुग्णालयात दाखल केले. त्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 11:28 am