पुण्यातील मुंढवा परिसरात एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) दुपारी घडली. अश्विनी गवारे (वय २२, रा. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती एका आयटी कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. या घटनेचा अधिक तपास मुंढवा पोलिस करत असून कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या आयटी कंपनीमध्ये आश्विनी गवारे ही तरूणी नोकरीस होती. मागील सात दिवसांपासून ती रजेवर होती. आजच सकाळी ती कामावर आली होती. त्यानंतर काही वेळाने अचानक ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि तेथून उडी मारून आत्महत्या केली. तर या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2018 2:26 pm