News Flash

पुण्यात केमिकल कंपनीला लागलेली आग नियंत्रणात

या घटनेत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

पुण्यातील विमाननगर भागातील बेकर्स केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. आगीच्या माहितीनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील बेकर्स केमिकल कंपनीला आज (शुक्रवारी) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच काही मिनिटात अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परंतु रसायनांमुळे या आगीने रौद्ररूप धारण केले होते.

दरम्यान, या घटनेत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 8:23 am

Web Title: pune fire in chemical factory fire brigade on spot jud 87
Next Stories
1 दहावी फेरपरीक्षेचा आज निकाल,इथं करा चेक
2 स्वारगेट कात्रज मेट्रो भुयारी की उन्नत
3 पर्यावरण करभरणा करूनही पुन्हा नोटीस
Just Now!
X