उड्डाण पूल पाडण्याच्या खर्चासंदर्भात पालिका प्रशासनाचा बचावात्मक पवित्रा

पुणे : सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ चौकाबरोबरच ई-स्वेअर चित्रपटगृहाजवळील उड्डाण पूल पाडून नव्याने उड्डाण पूल उभारणीसाठी पन्नास टक्के  खर्च महापालिके ने उचलावा, अशी भूमिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतली आहे. तसे पत्र पीएमआरडीएकडून महापालिके ला देण्यात आले आहे. मात्र पन्नास टक्के  खर्चाचा भार उचलण्यासंदर्भात प्रशासनाने बचावात्मक पवित्रा घेतला असून स्पष्ट मत देण्याऐवजी त्याबाबतचा निर्णय लोकप्रतिनिधींनी घ्यावा, अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिके साठी सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल चुकल्याचे निदर्शनास आल्यामुळे आणि या पुलांमुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे ते पाडून नव्याने उड्डाण पूल उभारण्या येणार आहेत. उड्डाण पूल आणि मेट्रो यांचा एकात्मिक आराखडा करण्यात आला असून पीएमआरडीएकडून त्याचे काम करण्यात येणार आहे. हे उड्डाण पूल पाडू नयेत, उड्डाण पूल पाडणे हा शेवटचा पर्याय असून अन्य पर्यायांचा विचार करावा, अशी सातत्याने मागणी होत असतानाही उड्डाण पूल पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. उड्डाण पूल पाडण्याच्या या निर्णयावर शहरात पडसाद उमटत असतानाच महापालिके कडून खर्चाबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र स्पष्ट भूमिका या प्रस्तावात घेण्यात आलेली नाही.  पीएमआरडीएने मागणी के ल्याप्रमाणे खर्चाची पन्नास टक्के  रक्कम द्यावी की नाही, या संदर्भातील निर्णय मुख्य सभेने घ्यावा, असे यात नमूद करण्यात आले आहे.

या एकात्मिक प्रकल्पाचा लाभ लक्षात घेऊन महापालिके ने या प्रकल्पाचा पन्नास टक्के  खर्च उचलावा, अशी शासनाची सूचना असल्याचे पीएमआरडीएकडून महापालिके ला कळविण्यात आले आहे. मात्र महापालिके चा सहभाग मूळ मेट्रो प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेच्या स्वरूपात आहे. त्यामुळे आराखडा प्रकल्प खर्चाचा भार महापालिके ला लागू नये, असा प्रस्ताव महापालिके ने ठेवला आहे. मात्र या संदर्भातील निर्णय स्थायी समितीमार्फत मुख्य सभेने घ्यावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

महापालिके ने पुणे विद्यापीठ चौकात पंधरा वर्षांपूर्वी ४० कोटी रुपये खर्च करून उड्डाण पूल बांधले आहेत. मात्र या उड्डाण पुलात दोष असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ते पाडून नव्याने दुमजली उड्डाण पूल बांधण्यात येणार आहेत. राज्य शासनानेही या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. नवीन उड्डाण पुलाच्या खर्चातील कोणताही वाटा राज्य सरकार उचलणार नाही. दुमजली पूल उभारणीसाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिके ला पन्नास टक्क्यानुसार आर्थिक भार उचलावा लागल्यास १२० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापालिका याचा खर्च करणार नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार तत्त्वत: मान्यता देण्यात आली. केंद्र सरकार, राज्य सरकार त्यासाठी मदत करणार असून वित्तीय संस्थांकडूनही निधी उभारला जाणार आहे. मात्र महापालिका पूल पाडण्याचा किं वा त्याच्या उभारणीचा कोणताही खर्च देणार नाही. प्रशासनाकडून तसा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका