स्वयंअध्ययनासाठी ७० हजार विद्यार्थ्यांची अ‍ॅपवर नोंदणी पूर्ण

पुणे : करोना संसर्गामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीत महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी घरातून शिका (लर्न फ्रॉम होम) हा उपक्रम महापालिके कडून सुरू करण्यात आला आहे. ई-लर्निग प्रकल्पाअंतर्गत महापालिका शाळांतून शिक्षण घेत असलेल्या मराठी आणि इंग्रजी माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास पूरक असे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपवर सत्तर हजार  विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

महापालिका शाळांतील बहुतांश वर्गशिक्षकांनी त्यांच्या वर्गाचा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार के ला आहे. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार झाले नसतील अशा शाळांनी तातडीने ते करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे. पालकांचे मोबाइल क्रमांक शिक्षकांना पाठविण्यात आले आहेत. व्हॉटसअ‍ॅप समूहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ए४ि्रे३१ं अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक लॉगईन आणि पासवर्ड तसेच अ‍ॅपचा वार कसा करायचा, याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांला हव्या त्या वर्गाचा आणि हव्या त्या विषयाचा अभ्यास करता येणार आहे.

इंग्रजी आणि गणित या विषयांचा अभ्यास सहज आणि सोपा व्हावा यासाठी काही सुविधाही यामध्ये देण्यात आल्या आहेत. ई-लायब्ररीच्या माध्यमातून पाठय़पुस्तकांबरोबरच एक हजारपेक्षा अधिक पुस्तके  अवांतर वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.  यादृष्टीने ऑनलाइन उपक्रमांची आखणी करण्यात येत असल्याची माहिती महापालिके च्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

ताडीवाला रस्ता परिसराची पाहणी

पुणे : महापालिके च्या ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ताडीवाला रस्ता परिसराची साखर आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी के ली. करोना प्रतिबंधाच्या दृष्टीने काही उपाययोजना राबविण्याची सूचना त्यांनी के ली.

साखर आयुक्त सौरभ राव यांच्याकडे ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या भागातील करोना परिस्थितीचा आढावा आणि कामकाजाच्या नियोजनासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा के ली.  प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत काही ठिकाणचे प्रवेश बंद करणे, वर्दळीवर नियंत्रण ठेवणे, स्वस्त धान्य दुकानांसह या भागातील भाजी विक्रीबाबत वेळेचे नियोजन करण्याबाबत त्यांनी काही सूचना के ल्या. यावेळी स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे, लता राजगुरू, प्रभाग समिती अध्यक्षा मंगला मंत्री, क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.