News Flash

पुण्यात भर पहाटे अग्नीतांडव; कॅम्पमधील मच्छी आणि चिकन दुकानांचा कोळसा

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

कॅम्प मार्केटमध्ये आग लागल्यानंतरचे दृश्य.

पुणे शहरातील कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील मच्छी आणि चिकनच्या दुकाने मंगळवारी पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. पहाटे झालेल्या या अग्नीतांडवात २५ दुकानं जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेले छत्रपती शिवाजी मार्केट हे सर्वात जुने मार्केट. या मार्केटमध्ये मंगळवारी पहाटे आगीने तांडव घातलं. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मच्छी, चिकन आणि अन्य वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. मार्केटमध्ये आज पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या मार्केटमध्ये दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, दलाने काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होतं. या घटनेत मच्छी विक्रेत्यांची १७ आणि चिकन विक्रेत्यांची ८ अशी २५ दुकाने जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून, ८ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 10:09 am

Web Title: pune news pune letest news fire broke out in pune camp area 25 shops burnt bmh 90 svk 88
Next Stories
1 दहावी, बारावीचे नमुना प्रश्नसंच विद्या प्राधिकरणाकडून उपलब्ध
2 सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए पदव्युत्तर पदवीला समकक्ष
3 गुरुवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज
Just Now!
X