07 July 2020

News Flash

पुणे : श्री महालक्ष्मीला सोन्याची साडी अर्पण; दसऱ्याला देवीचे सुवर्णवस्त्रातील रुप पाहता येणार

अंदाजे १३ किलो वजनाची ही साडी संपूर्ण शुध्द सोन्यापासून तयार करण्यात आली आहे.

पुण्यातील सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला बुधवारी सोन्याची साडी अर्पण करण्यात आली.

पुण्यातील सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला बुधवारी मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. नवरात्रोत्सव काळात मंदिर प्रशासनाकडून अशी साडी देवीला नेसवण्यात येते. शुद्ध सोन्यात बनवलेली १३ किलो वजनाची ही साडी आहे.

श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ८ वे वर्ष आहे. दरवर्षी विजयादशमीनिमित्त श्री महालक्ष्मी देवीस सोन्याची साडी परिधान करण्याची श्री महालक्ष्मी मंदिराने प्रथा पाडली आहे. अंदाजे १३ किलो वजनाची ही साडी संपूर्ण शुध्द सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. कुंभकोणम येथील कारागिरांनी तब्ब्ल १ वर्षे मेहनत करून ही साडी तयार केली आहे.

कुंभकोणम येथील हे हे सुवर्ण कारागीर देवीच्या या सोन्याच्या साडीच्या कामासाठी गेल्या वर्षभरापासून पुण्यात मुक्कामी होते. इथे राहुनच त्यांनी मोठ्या कलाकुसरीने अहोरात्र मेहनत घेऊन ही अनोखी साडी तयार केली आहे.

ही सोन्याची साडी खास विजयदशमीच्या दिवशी देवीला नेसवली जाते. सुवर्ण वस्त्रामधील देवीचे हे आगळे वेगळे रूप भाविकांना उद्या विजयादशमीच्या दिवशी रात्रीपर्यंत अनुभवता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2018 6:07 pm

Web Title: pune offering gold sari for godess mahalaxmi
Next Stories
1 होर्डिंगची बसली भीती; पुण्यातील गृहस्थ बस आणि चारचाकीतही वापरतात हेल्मेट
2 कर्करोगानं ग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
3 भाई म्हणून नमस्कार करायचा.. पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रॅगिंग
Just Now!
X