27 January 2020

News Flash

कव्हर घातलेल्या गाडीमध्ये प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे, आजीबाईंमुळे प्रकरण उघडकीस

पुण्यामधील कोथरुड येथील घटना ठरतेय चर्चेचा विषय

कव्हरमधील हीच ती गाडी

एखाद्या गाडीमध्ये प्रेम करणारे प्रेमीयुगुल सिनेमांमधील विनोद दृष्यांमध्ये अनेकदा पहायला मिळते. मात्र पुण्यामधील कोथरुड येथे खरोखरच असा प्रकार घडला असून एका आजीबाईंना कव्हर घातलेल्या गाडीतून आवाज येत असल्याचे जाणवल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रमुख सोसायटीच्या प्रवेशद्वारावर गाडी पार्क करुन गाडीवर कव्हर टाकून या गाडीमध्ये एक प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत होते. मात्र सोसायटीमधील एका आजीने हा प्रकार सोसायटीमधील लोकांच्या निर्दर्शनास आणून दिल्यानंतर या प्रेमीयुगुलाचे बिंग फुटले.

सामान्यपणे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या गाड्यांवर पावसाचे पाणी आणि झाडांवरील पालापाचोळा पडू नये म्हणून कव्हर घातले जाते. अशीच एक कव्हर घातलेली गाडी परमहंसनगरमधील मिलेट्री गेटजवळ उभी होती. ही गाडी पार्क करण्यात आलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या बंगल्यात राहणाऱ्या आजींना या गाडीमधून एसीचा आवाज येत आहे असं वाटलं. गाडीत मुले अडकल्याने गुदमरुन त्यांच्या मृत्यू झाल्याच्या बातम्या या आजींच्या ऐकिवात होत्या. त्यामुळेच हा तसाच प्रकार असल्याचे त्यांना वाटले. त्यांनी आजूबाजूच्यांकडे कोणी पाहुणे गाडी घेऊन आले आहेत का याबद्दल चौकशी केली. मात्र शेजारी कोणीच पाहुणे आले नसल्याचे त्यांना समजले. त्यावेळी त्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना यासंदर्भात माहिती दिली. तसेच या गाडीमध्ये लहान मुले किंवा कोणीतरी अडकले असल्याची शक्यताही या आजींना व्यक्त केली. त्यामुळेच सोसायटीच्या अध्यक्षांनी काही रहिवाश्यांना सोबत घेऊ गाडीजवळ जाऊन तपासणी केली असता आवाज येत असल्याचे स्पष्ट झाले. सर्वांनी मिळून या गाडीचे कव्हर काढण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा या गाडीचे कव्हर काढण्यात आले तेव्हा लाल रंगाच्या गाडीमध्ये एक प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असताना अढळले. समोरील प्रकार बघून नागरिकांना धक्काच बसला.

सोसायटीमधील रहिवाश्यांनी या प्रेमीयुगुलाला समज देऊन सोडून दिले. मात्र तरीही या प्रकरणाची चर्चा सोशल मिडियावर आणि पुण्यातही सुरु आहे.

First Published on July 22, 2019 1:24 pm

Web Title: pune people caught couple making love under covered car scsg 91
Next Stories
1 सिंहगड एक्स्प्रेसला रोज उशीर, संतप्त प्रवाशांचा रेल्वे अधिकाऱ्याला घेराव
2 आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या
3 पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर काँग्रेस अध्यक्षपदासाठी करणार अर्ज
Just Now!
X