News Flash

पुण्यातील खड्डे समस्या लवकरच मार्गी लागणार

दहा दिवसांत रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे महापौरांचे आदेश

पुणे शहरातील रस्त्यांची सध्या परिस्थिती लक्षात घेता. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून पुढील दहा दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. अशा स्वरूपाचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिले.

पुणे शहरातील अनेक रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डे पडले असल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावरील खड्डे चुकवताना दुचाकी चालकाच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. यासह अनेक प्रश्न विचारत नगरसेवकांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. त्यावर पथ विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी शहरातील रस्त्यांबाबत खुलासा सादर केला. मात्र त्यावर देखील नगरसेवकानी आक्षेप नोंदविला. महापौर मुक्ता टिळक यांनी, शहराची सद्य स्थिती लक्षात घेता येत्या दहा दिवसांत खड्डयाची दुरुस्ती करण्यात यावी. असे आदेश प्रशासनाला दिले. या आदेशामुळे पुणेकर नागरिकांची खड्ड्यांच्या त्रासातून सुटका होण्यास मदत होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 8:25 pm

Web Title: pune pothole problem will be resolved soon msr 87
Next Stories
1 मुलीला छेडणाऱ्या तरूणाला वडिलांनी चोपले
2 पुणेकारांची पाणी कपातीच्या संकटातून होणार सुटका
3 मटणाचे दुकान चालवण्यासाठी चोरायाचा शेळ्या
Just Now!
X