पुण्यातील टिळक रोडवरील गिरीजा हॉटेलजवळ भर रस्त्यात तरुणावर चाकूहल्ला झाला आहे. तीन जणांनी मिळून याठिकाणी थांबलेल्या एकावर चाकूने सपासप वार केले. या प्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश आले आहे. समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने हा हल्ला झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. रविवारी दुपारी भर रस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात एकच घबराट उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक रोडवरील काका हलवाई या मिठाई दुकानाच्या समोरील बाजूस असणाऱ्या बस स्टॉपजवळ ही घटना घडली. याठिकाणी दिनेश उर्फ सुरेश कांबळे (वय २४) हा तरुण दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास थांबला होता. तेवढ्यात मयूर मोतीराम राठोड (वय १८) महेश धनेश तिवारी (वय १८) अशी आणि आणखी एक अल्पवयीन आरोपी याठिकाणी आले. त्यांनी दिनेशला समलैंगिक संबंधांची मागणी केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद विकोपाला जाऊन तिन्ही आरोपींनी दिनेश याच्यावर चाकूने वार केले.

या अचानक झालेल्या हल्ल्यात दिनेश गंभीर जखमी झाला आणि खाली कोसळला. तर आरोपींना याठीकाणहून पळ काढताना नागरिकांनी पकडून ठेवले. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पकडलेल्या तिन्ही संशयित आरोपींना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात केले. तर हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला त्वरित ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. पोलिस या घटनेचा तपास करत असून या सर्वांची नावे आणि अशाप्रकारे हल्ला करण्यामागचे कारण स्पष्ट होईल असे सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune tilak road 3 youngsters stabbed one on sunday afternoon accused arrested by police transgender
First published on: 21-10-2018 at 16:54 IST