पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विंग पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. रंगमंच सहाय्यक विजय महाडीक असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विजय महाडीक हे पुण्यातील धनकवडीत रहात होते. ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे कर्मचारी होते. काल मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ते स्टेज रिकामं करण्याचं काम करत होते. त्याचवेळी हा अपघात घडला.

स्टेज रिकामं करण्यासाठी महाडिकांनी विंग हलवली. त्यावेळी एक लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यात पडला. डोक्यात रॉड पडल्यानं महाडिकांना गंभीर दुखापत झाली. यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात आज सकाळी हॅम्लेट नाटकाचा प्रयोग होता. त्याचमुळे ते रंगमंच रिकामा करत होते. रात्री ही घटना घडल्याने पुण्यात हळहळ व्यक्त होते आहे.