नगरसेवक : अब्दुल पठाण, परवीन शेख, हमिदा सुंडके , साईनाथ बाबर

कोंढवा खुर्द – मीठानगर, प्रभाग क्रमांक २७

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे : शिवनेरीनगर, भाग्योदय नगर, मीठानगर, कोंढवा खुर्द, शाह इस्टेट, अमर रेसिडेन्सी, लुल्ला नगर

नगरसेवकांचे दावे

दोन पाण्याच्या टाक्या पूर्ण

पावसाळी वाहिन्यांची कामे प्रगतिपथावर

लुल्लानगर उड्डाणपूल मार्गी

सर्व घटकांसाठी विविध उपक्रम

नागरिकांशी दैनंदिन संवाद

प्रथमेश गोडबोले, लोकसत्ता

पुणे : शहरापासून जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महापालिके च्या कोंढवा खुर्द-मीठानगर (प्रभाग क्रमांक- २७) या प्रभागात  पाणी, वीज, रस्ते अशा मूलभूत सुविधा पूर्णपणे पोहोचलेल्या नसल्याची वस्तुस्थिती आहे. या भागाचा सर्वागीण विकास नगरसेवकांना करता आलेला नाही. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रश्न कायम असल्याचे दिसून येते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नसून ठोस उपाययोनजा राबविल्या जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

कोंढवा खुर्द-मीठानगर प्रभागातील विकास आराखडय़ातील रस्त्यांची कामे मार्गी लागलेली नाहीत. अपुरे रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी नित्याची आहे. विजेच्या तारा भूमिगत के लेल्या नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका आहे. पावसाळी वाहिन्यांची कामे झाली नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी येण्याच्या घटना घडतात. पिण्याच्या पाण्याची समस्याही कायम आहे. या भागातील सोसायटय़ांना टँकरने पाणीपुरवठा के ला जातो.

प्रभागात ओढे, नाले आहेत. त्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा, राडारोडा टाकण्यात येतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे. अरूंद आणि खराब रस्ते असल्याने अत्यवस्थ नागरिकांना रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा किं वा रुग्णवाहिका प्रभागातील काही भागात जाऊच शकत नसल्याचे चित्र आहे. गटार, कचऱ्याची समस्याही कायम आहे. गटारे वेळोवेळी साफ के ली जात नाहीत, तसेच कचराही महापालिके कडून कित्येक दिवस उचलला जात नसल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. पावसाळी वाहिन्यांची कामे झालेली नसल्याने पावसाळ्यात पाणी साचून राहते, तसेच जास्त पाऊस झाल्यास पावसाचे पाणी घरांमध्येही शिरते.

प्रभागातील नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचीही तक्रार कित्येक वर्षांपासून आहे. कचरा घेऊन जाण्यासाठी महापालिके ची गाडी दररोज येत नसल्याने कचराकु ंडय़ा भरून वाहत असतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रभागात अनेक ठिकाणी पथदिवेच नाहीत, तर पथदिवे असलेल्या ठिकाणी पथदिवे लागत नसल्याने सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य असते, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

नागरिक म्हणतात

गेल्या चार वर्षांत कोणत्याही प्रकारची ठोस कामे प्रभागात झालेली नाहीत. पावसाळी वाहिन्यांची कामे झाली नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात प्रभागातील अनेक भागात पाणी साचते, तसेच घरांमध्येही पाणी येते. वीज आणि पाणीपुरवठय़ाचा प्रश्न अतिशय गंभीर असून सातत्याने ज्योती चौक, कोंढवा खुर्द भागात वीजपुरवठा खंडित होतो. प्रभागात रस्ते, पाणी, वीज, कचरा अशा पायाभूत सुविधांची वानवा आहे.

– प्रवीण जगताप, मीठानगर

प्रभागात कचराकु ंडय़ांमध्ये साचलेला कचरा कित्येक दिवस उचलला जात नाही. कचरा साचून राहिल्याने त्यातून दरुगधी सुटून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागात लहान मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदाने नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागांत पाणी साठते. पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने घरांमध्येही पाणी येण्याच्या घटना घडतात.

– माणिक गुर्जर, कोंढवा खुर्द

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

अतिक्रमणे हटवल्यास प्रभागात पीएमपीची सेवा सुरू होऊ शकते. प्रभागातील डीपी रस्ते रखडले आहेत. तसेच वीज, सांडपाणी आणि पावसाळी वाहिन्यांची कामे न करताच सिमेंटचे रस्ते के ले आहेत. शिवनेरीनगर, भाग्योदय नगर, मीठा नगर येथे ६० हजार लोकसंख्या असताना के वळ दहा हजार लोकसंख्येसाठीची वीज यंत्रणा अस्तित्वात आहे.

– अमर गव्हाणे, भाजप

गेल्या चार वर्षांत विद्यमान नगरसेवकांकडून एकही मोठे काम झालेले नाही. सिमेंटचे रस्ते, पावसाळी व सांडपाणी वाहिन्यांची काही कामे झाली आहेत. शाळा, रस्ते, भाजी मंडई, उद्यान यांची के वळ उद्घाटने झाली असून त्यानंतर या सुविधांकडे नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाकडून पाहिले देखील नाही. प्रभागात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो.

– नूर शेख, काँग्रेस</p>

तक्रारींचा पाढा

कचरा, पाणी, वीज, रस्ते, विजेची वानवा

उच्चदाब वीजवाहिन्या भूमिगत न के ल्याने नागरिकांना धोका

सांडपाणी वाहिन्यांचा अभाव

विस्कळीत पाणीपुरवठा

लोकप्रतिनिधी म्हणतात

गेल्या २५ वर्षांपासून कोंढवा आणि परिसराचा विकास झालेला नाही. त्यामुळे या भागाचा सर्वागीण विकास करण्यासाठी दरवर्षी २० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र, विरोधी पक्षाचा नगरसेवक असल्याने कमी निधी मिळत असूनही प्रभागात रस्ते, पाणी, वीज, उद्याने अशा पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न के ला आहे. काही प्रकल्प अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण करू.

– अब्दुल पठाण, नगरसेवक

कोंढवा खुर्द येथे वसतिगृह आणि सांस्कृतिक के ंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. लुल्लानगर येथे पाण्याच्या वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण के ले.  सिमेंटचे रस्ते, अहिल्यापेठ मशिद येथे पावसाळी वाहिन्यांची कामे पूर्ण के ली आहेत. शीतल पेट्रोल पंपामागे भाई मंडई प्रस्तावित के ली आहे. मीनाताई ठाकरे रुग्णालयात २० खाटांचे करोना के ंद्र, सोनोग्राफी के ंद्र सुरू के ले आहे.

– परवीन शेख, नगरसेविका

शिवनेरीनगर येथे स्वनिधीतून ७० लाख लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या पूर्ण के ल्या. बॅटमिंटन सभागृहाचे काम पूर्ण झाले असून ई-लर्निग स्कू लचे काम अंतिम टप्प्यात आहे. बहुउद्देशीय सभागृह तयार असून दुसऱ्या सभागृहाचे कामही प्रगतिपथावर आहे. मीठानगर येथे दवाखाना सुरू के ला आहे. दोन स्वतंत्र उद्याने सुरू के ली आहेत.  ३५ कि.मी. पाणी वाहिन्यांची कामे पूर्ण के ली.

– साईनाथ बाबर, नगरसेवक

प्रभागातील समस्यांचा लेखाजोखा

महापालिके च्या गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी नागरिकांना भरघोस आश्वासने दिली होती. या आश्वासनांचे काय झाले, कोणती कामे झाली, कोणत्या योजना प्रत्यक्षात आल्या याचा आढावा ‘प्रभागाचे प्रगतिपुस्तक’ या वृत्तमालिके तून दररोज घेतला जात आहे.

प्रभागांमधील नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक काय करत आहेत, गेल्या साडेतीन वर्षांत कोणत्या समस्या सुटल्या, कोणती कामे रखडली, कोणती कामे झाली याची सविस्तर माहिती या वृत्तमालिके तून देण्यात येत आहे. वृत्तमालिका सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत असून विविध प्रभागातील नागरिकांनी त्यांना दैनंदिन भेडसाविणाऱ्या समस्या कळविल्या आहेत. यातील काही निवडक समस्यांची माहिती या सदरातून प्रसिद्ध के ली जात आहे.

नागरिकांनी आपल्या भागातील समस्या, प्रश्न पुढील ई-मेल पत्यावर पाठवावेत. समस्यांचे छायाचित्रही पाठविता येईल. आपले नाव आणि संपर्क क्रमांकही अवश्य द्यावा.

इ-मेल-  lokpune4@gmail.com