पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी राहुल श्रीरामे यांची नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने दिले. त्यानुसार, नवनियुक्त पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी शनिवारी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तपदाचा पदभार स्विकारला.

परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तपदी प्रियंका नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री गृहविभागाने दिलेल्या आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या. पुणे शहर परिसरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वाहतुकीला शिस्त लावणे तसेच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. वाहतुकीच्या समस्या सोडविणे तसेच वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.

navi mumbai rto officer arrested marathi news, rto officer navi mumbai crime marathi news,
नवी मुंबई: अवजड वाहने चोरी करून विकणाऱ्या टोळीस अटक, अटक आरोपींमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी
Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
Traffic changes in Collectorate area on the occasion of Dr Ambedkar Jayanti
पुणे : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती

दरम्यान, शहर पोलीस दलातील दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. फरासखाना विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलींद पाटील यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली तसेच खडकी विभागातील सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.